चिपळूण शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी भाजप नेते तथा उपनगर परिषद निवडणूक संयोजक प्रशांत यादव भाजपा उतरत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत चिपळूणच्या स्मार्ट सिटी संदर्भात चर्चा केली. यावर रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी आपले सर्वोत्तम सहकार्य राहील असा विश्वास भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीतर्फे निवडणूक लढवली गेली यामध्ये भाजपाने ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. यामध्ये ७ नगरसेवकांनी दमदार विजय मिळवत मागील निवडणुकीपेक्षा जागा वाढवण्यात यश मिळवले. नगरपरिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर निवडणूक संयोजक म्हणून सोपवण्यात आली होती. यादव यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अनिकेत पटवर्धन यांचे देखील सहकार्य मिळाले.
यानंतर नुकतेच भाजप नेते तथा चिपळूण नगरपरिषद निवडणूक संयोजक प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समावेत भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले.
यावेळी भाजपा उत्तर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोलजी भोबस्कर, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भूरण, शहराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्षा नवनिर्वाचित नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, नगरसेविका सौ. रूपाली दांडेकर, नगरसेविका सौ. अंजली कदम, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदिप भिसे, माजी नगरसेवक विजयराव चितळे, पंचायत राज जिल्हा संयोजक योगेश शिर्के, अभिजित जागुष्टे , बापू कांबळी, कुणाल आंबेकर, प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज , विनोद चव्हाण उपस्थित होते.