RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पुढील दिशा स्पष्ट

चिपळूण – नुकत्याच पार पडलेल्या चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख श्री. रविंद्रजी डोळस यांनी चिपळूण येथील पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री. मिथिलेश उर्फ विकी नरळकर, सौ. कांचन शिंदे, श्री. संजय गोताड, सौ. वैशाली कदम व श्री. अजय भालेकर यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच चिपळूणच्या विकासात्मक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत नागरिकांच्या हितासाठी एकसंघपणे काम करण्याचा संदेश देत नगरपरिषदेमधील पक्षाच्या आगामी भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच निवडणुकीत यश न मिळालेल्या सर्व उमेदवारांचीही श्री. डोळस यांनी भेट घेतली. निवडणूक काळातील अडचणी, अनुभव आणि एकूणच राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करत त्यांना खचून न जाता सर्वांना नव्या उमेदीने जनसंपर्क वाढवण्याचे आणि पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

या वेळी चिपळूण तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर, शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम, युवा सेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे, शहर सचिव श्री. प्रशांत मुळये, उपतालुकाप्रमुख श्री. सचिन शेट्ये, श्री. राजाभाऊ नारकर, विभागप्रमुख श्री. अजित गुजर, उपविभागप्रमुख श्री. विनायक वास्कर, श्री. राजू सुर्वे तसेच तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री. सचिन चोरगे उपस्थित होते.

या भेटीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची चिपळूणमधील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त झाला.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.