RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

कोकणातील 27 पैकी 25 नद्या नियंत्रणात रायगडमधील ‘अंबा’ आणि रत्नागिरीतील ‘जगबुडी’ने ओलांडली इशारा पातळी

नवी मुंबई, (विमाका):- कोकण विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी तब्बल 25 नद्या सध्यातरी इशारा पातळीच्या खाली सुरक्षितपणे वाहत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील ‘अंबा’ नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील ‘जगबुडी’ नदी या दोन नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रायगडच्या रोहा तालुक्यातील अंबा नदीची इशारा पातळी 8.00 मीटर असताना आज तिची पातळी 8.70 मीटरवर पोहोचली आहे, जी धोका पातळी असलेल्या 9.00 मीटरच्या अगदी जवळ आहे. तसेच, रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीची इशारा पातळी 5.00 मीटर असून सध्या ती 5.20 मीटरवर वाहत आहे; या नदीची धोका पातळी 7.00 मीटर आहे. या दोन्ही नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी बदलापूर (13.40 मी), जांभूळपाडा (10.50 मी) आणि मोहने (5.25 मी) येथे सुरक्षित पातळीवर वाहत आहे. टिटवाळ्यातील काळू नदी 99.60 मीटरवर तर शहापूरमधील भातसा नदी 31.10 मीटरवर असून त्या अद्याप धोक्यापासून दूर आहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या (6.70 मी), वैतरणा (97.70 मी) आणि पिंजाळ (97.80 मी) या नद्यांची पातळीही पूर्णपणे नियंत्रणात आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका (22.70 मी), सावित्री (4.00 मी), पाताळगंगा (18.80 मी), उल्हास-कर्जत (43.20 मी) आणि गाढी (3.65 मी) या नद्या सध्यातरी शांत आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. रत्नागिरीतील वशिष्टी (2.53 मी), शास्त्री (4.20 मी), सोनवी (3.80 मी), काजळी (14.65 मी), कोदवली (3.00 मी), मुचकुंदी (0.70 मी) आणि बावनदी (6.12 मी) या नद्या स्थिर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी (37.70 मी), तेरेखोल (2.10 मी), कर्ली (4.50 मी), गडनदी (35.00 मी) आणि वाघोटन (5.60 मी) या सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा बऱ्याच खाली वाहत आहेत. संपूर्ण कोकण विभागात 27 नद्यांपैकी केवळ 2 नद्या वगळता सर्व नद्यांची पातळी नियंत्रणात असल्याने सध्या पूरस्थिती नसली, तरी नागरिकांनी आणि पर्यटकांनी नद्यांच्या पात्राजवळ जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

maldives casino

KIBRIS GECE HAYATI

KIBRIS ESCORT

Makrobet

makrobet

Makrobet

makrobet

makrobet