/ Sep 07, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

कोकणाला जोडणाऱ्या सहा घाट रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षितेचा आढावा घ्यावा

माजी आमदार विनय नातू यांची मागणी

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जोडपत्रावर मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश

चिपळूण – कोकणाला जोडणाऱ्या सहा घाट रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षितेचा आढावा घेतला घ्यावा अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी कोकणातील जवळपास सर्वच आमदार व खासदार यांच्याकडे केली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री उदय सामंत पालकमंत्री भरत गोगावले,खासदार नारायण राणे खासदार सुनील तटकरे, खासदार विनोद तावडे व कोकणातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले आहे.

विनय नातू यांनी या निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये मुंबई-गोवा रस्त्याचा येणारा जाणारा वाहतूक व्यवस्थेकरिता व रस्त्याच्या सुधारणाकरिता विविध बैठका पुढील काही दिवसात होतील. त्यामध्ये मुख्यतः अवजड वाहतूक या मुंबई-गोवा रस्त्यावरती बंद केली जाईल व रस्त्यावरील खड्‌डे व माणगाव- इंदापूर कोलाड येथील होणारा वाहतूक अडथळा याबाबत उपाययोजना केल्या जातील. परंतु त्याच बरोबर ताम्हणी घाट, वरंघाघाट व महाबळेश्वर घाट हे रायगड जिल्ह्याला जोडणारे तीनही घाट सुस्थितीत राहावेत याकरिता स्वतंत्र उपाययोजना केली पाहिजे. तसेच कुंभार्ली घाट, आंबा घाट व अणुस्कुरा घाट हे तीन रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे मुख्य घाट रस्ते, खड्‌डे मुक्त व व्यवस्थित व वाहतूक अडथळा न होता असणारे राहण्याकरताची उपयोजना केली पाहिजे. याकरिता मुंबई-गोवा महामार्गासोबतच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामधील या सहा घाट रस्त्यांच्या कामाचाही आढावा घतला जावा व ह सहा घाट रस्त खड्ड मुक्त व सुराक्षत राहण्याकारता तपासणी कराव्यात अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी केली आहे या निवेदनाच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी असे निर्देश दिलेले आहेत.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.