/ Sep 04, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

कृषी यांत्रिकीकरणाची स्वतंत्र सोडत जाहीर; चिपळूण-संगमेश्वरातील ७१९ शेतकऱ्यांची निवड

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा यशस्वी!

चिपळूण-संगमेश्वरातील शेतकऱ्यां ऱ्या प्रलंबित मागणीला न्याय; आधुनिक शेती अवजारांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

चिपळूण – कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे यांत्रिकीकरण योजनेसाठी कोकण विभागाची स्वतंत्र सोडत जाहीर करण्यात आली असून, चिपळूण तालुक्यातील ३३१ आणि संगमेश्वर तालुक्यातील ३८८, अशा एकूण ७१९ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करूनही राज्यस्तरीय सोडतीमध्ये संधी न मिळाल्याने कोकणातील अनेक शेतकरी पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर टिलर तसेच आधुनिक कृषी अवजारांचा लाभ घेण्यास विलंब होत होता.कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती, भातशेतीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी लक्षात घेऊन कोकणासाठी स्वतंत्र सोडत काढण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी शासन व कृषी विभागाकडे केली होती. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत कोकण विभागासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेची विशेष स्वतंत्र सोडत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे चिपळूण-संगमेश्वरातील ७१९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आधुनिक कृषी अवजारांच्या माध्यमातून शेती अधिक सुलभ व यांत्रिक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाला न्याय मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.