/ Oct 07, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

प्रभाग क्रमांक १५ मध्ये महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर मेकअप प्रशिक्षण शिबिर आयोजित

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक १५च्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकारातून प्रभागातील महिलांसाठी दि. ६, ७ व ८ ऑक्टोबर रोजी मोफत ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सौ. वर्षा ढेकणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी मनोगत व्यक्त करताना *सौ. वर्षा परशुराम ढेकणे* यांनी प्रभाग क्रमांक १५मध्ये महिलांसह नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे महत्त्व सांगितले. महिलांना कौशल्याचे प्रशिक्षण मिळून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, घरातून व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या मोफत ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षणासाठी *खुशी ब्युटी पार्लरचे विशेष सहकार्य लाभत असून, सौ. सुचिता प्रवीण ढेकणे* यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना ब्युटी पार्लर आणि मेकअपचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.महिलांच्या कलागुणांना आणि कौशल्याला योग्य दिशा मिळावी यासाठी भविष्यातही प्रभागात अनेक मोफत प्रशिक्षण शिबिरे, आरोग्यविषयक उपक्रम तसेच महिला सक्षमीकरणाचे विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास *सौ. वर्षा ढेकणे* यांनी व्यक्त केला.महिलांनी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

avrupabet

avrupabet

avrupabet

avrupabet