चिपळूण : सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने चिपळूण पंचायत समितीला जलसंधारणाच्या कामासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले.
यावेळी चेक डॅम (लघु बंधारा) बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या बॅग्स तसेच १०० किलो काळी प्लास्टिक शीट पंचायत समितीकडे सुपूर्द करण्यात आली.ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या कामांना हातभार लागावा आणि पाणी साठवण व संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ मिळावे, या उद्देशाने कंपनीने हा सामाजिक उपक्रम राबविला.यावेळी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने श्री. शरद जाधव (डीजीएम – एचआर) आणि श्री. एकनाथ मालुसरे (एएम – एचआर) उपस्थित होते. पंचायत समिती, चिपळूणच्या वतीने उपसभापती श्री. संदेश अयारे, श्री. अमोल पाटील आणि श्री. के. डी. पवार यांनी साहित्य स्वीकारले.जलसंधारणाच्या कार्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य केल्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कंपनीच्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील जलसंधारणाच्या कामांना मदत मिळणार असून, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून समाजहिताच्या कार्याला चालना मिळत आहे.