RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

देवरूखच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

अनिकेत पटवर्धन यांच्या
विशेष प्रयत्नातून शासनाची मंजुरी

देवरुख(तालुका संगमेश्वर ) – संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे वैद्यकीय येथील सोयी सुविधांमध्ये वाढ होणार आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अनिकेत पटवर्धन यांनी विशेष प्रयत्न करून हा दर्जा प्राप्त करून दिला आहे. या संदर्भात शासनाने दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ चा अध्यादेश जारी करून अधिकृत मान्यता दिली आहे.

देवरुख येथे ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत आहे या इमारतीमध्ये ३० खाटांचे सद्यस्थितीत रुग्णालय सुरू आहे परंतु अनेक लोकांच्या मागणीने या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी अनिकेत पटवर्धन यांनी विशेष प्रयत्न केले व त्यामुळे सध्या आता या रुग्णालयाला शासनाच्या अध्यादेशानुसार ५० खाटांच्या रुग्णालयाची मंजुरी मिळाली आहे व त्यानुसार हे रुग्णालय आता ‘उपजिल्हा रुग्णालय ‘ या वर्धित श्रेणीमध्ये आल्यामुळे हा दर्जा प्राप्त झाला आहे शासनाने या संदर्भात दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ ला अध्यादेश जारी करून प्रशासनाला याची सूचना पारित केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहर हे अत्यंत मध्यवर्ती शहर आहे आणि या शहरांमध्ये आता विकासाच्या कामांनी जोर घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर रुग्णालयाची श्रेणीमध्येही वाढ झाल्यानंतर येथील फायदा ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे अनेकांनी याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.

आ

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.