लोटे ता.खेड – लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लि., लोटे परशुराम या कंपनीने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत जि.प.पू. प्राथ. आदर्श शाळा,(सोनगाव माठवाडी), ता. खेड, जि. रत्नागिरी येथे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी शालेय साहित्यासाठी ०४ कपाटे प्रदान केली.सदर कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
यावेळी कंपनीच्या वतीने श्री. शरद जाधव, श्री. श्रीपतराव देसाई, श्री. नवीन पाटील, श्री. एकनाथ मालुसरे आणि श्री. यश डिगे हे मान्यवर उपस्थित होते.गावच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू घाग, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी शाळेच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना कंपनीचे अधिकारी श्री. शरद जाधव म्हणाले, _”शिक्षणाच्या प्रसारासाठी कंपनी नेहमीच कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे.”_शाळेला कपाटांची नितांत आवश्यकता होती. या मदतीमुळे शालेय पुस्तके, रेकॉर्ड व शैक्षणिक साहित्य सुरक्षित ठेवणे सुलभ होणार आहे. त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षकांनी केले. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम पार पडला असून, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.