रत्नागिरी – संतोष अबगूल व प्रमोद गांधी या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे 8 नोव्हेंबरला गुहागरात येत असून त्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मनसेच्या कार्यालयाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. दापोली व एक गुहागर तालुक्यात हे उमेदवार देण्यात आले आहेत. राज ठाकरे या प्रचाराकरिता येणारा असून यावेळी ते काय मुद्दे मांडणार आहेत याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.