RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

रत्नागिरीत महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी: मोफत सेमिनारचे आयोजन!

  • रत्नागिरी | महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि कोकणातील पर्यटन क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI) तर्फे रत्नागिरीत प्रथमच महिलांसाठी “पर्यटनातील करिअर – दिशा आणि संधी” या विषयावर एका मोफत एज्युकेशनल सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.


आज कोकणात पर्यटनासाठी आणि व्यवसायासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यात महिलांनाही मोठ्या संधी मिळू शकतात. एअरपोर्ट, हॉटेल्स, ट्रॅव्हल कंपन्या, रिसॉर्ट्स येथे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. टुर गाईड, टुर कोऑर्डिनेटर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा भूमिका निभावण्याची तयारी महिलांना करता येईल. तसेच, कोकणातील महिलांसाठी स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनात सहभाग घेण्याची संधी आहे आणि स्वतःचे होम स्टे सुरू करण्यासारख्या अनेक विविध संधी उपलब्ध आहेत. “पर्यटन करताना करिअर घडवता येईल का?”, “ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करता येईल का?”, “पदवी शिक्षण करताना पर्यटन विषयातील व्यावसायिक शिक्षण घेता येईल का?” असे अनेक प्रश्न महिलांना सतावत असतात. यासाठी, संपूर्ण कोकणातील महिलांसाठी एक नवी दिशा देणारा हा सेमिनार ठरणार आहे.
या सेमिनारमध्ये महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, आवश्यक कौशल्ये, कोकणातील पर्यटन उद्योगाचा विस्तार आणि पुढील काळात पर्यटनात उदयास येणाऱ्या करिअरच्या दिशा याबाबत पर्यटन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र होणार असून सहभागी होणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र देखील मिळेल. या सेमिनारसाठी प्रवेश विनामूल्य असून, मात्र पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
हा मोफत सेमिनार सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, व्यंकटेश हॉटेल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
या सेमिनारनंतर BKVTI तर्फे १२वी नंतर कोणत्याही शाखेतील महिलांसाठी एक वर्षाचा पार्ट टाईम डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच करिअर तयार करण्याची संधी यामार्फत महिलांना मिळणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी 7499821369 या क्रमांकावर संपर्क साधा.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी प्रकल्प, BKVTI स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या व प्राचीन कोकणच्या संचालिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि प्रकल्प समन्वयक श्री. स्वप्निल सावंत यांनी “काहीतरी वेगळं करायचं आहे!” असे वाटत असलेल्या सर्व महिला, मुली आणि पालकांनी या सेमिनारसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.