RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

खेडमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचे शानदार उद्घाटन

शिवसेना नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम आणि प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

खेड : खेड नगरपालिकेच्या समोरील तीन बत्ती नाका येथे मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या शॉपीचे रविवारी (ता. 24) शिवसेना (शिंदे गट) नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले.


वाशिष्ठी शॉपीचे चालक प्रसाद बाळकृष्ण शेट्ये यांच्या मातोश्री नीलम शेट्ये यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेट्ये कुटुंबियांच्या वतीने रामदासभाई कदम आणि प्रशांत यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. श्री. कदम आणि श्री. यादव यांनी शेट्ये कुटुंबियांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मी इंडस्ट्रीचे मालक विलास बुटाला, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख कुंदन सातपुते, निकेतन पाटणे, भूषण चिखले, पुष्पेंद्र दिवटे, दर्शन महाजन, सिद्धेश खेडेकर, सौ. मधुरा प्रसाद शेट्ये, कार्तिकी प्रसाद शेट्ये यांच्यासह प्रशांत यादव यांचे सहकारी योगेश शिर्के, राहुल पवार आदी उपस्थित होते. तसेच माजी आमदार संजयराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत अण्णा कदम, माजी नगरसेवक अंकुश विचारे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदींनी वाशिष्ठी शॉपीला भेट देऊन शेट्ये कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
या शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम आणि आगामी गणेशोत्सवानिमित्त खास लज्जतदार मोदकही उपलब्ध असणार आहेत. दर्जेदार उत्पादनांमुळे वाशिष्ठी डेअरीवरील विश्वास वाढत आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना या शॉपीचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.