उद्योजक उदय लोध यांनी प्रशांत यादव यांनी व्यक्त केला विश्वास
- चिपळूण (प्रतिनिधी):– पेट्रोल व सीएनजी व्यवसायात सेवा ही सतत द्यायला पाहिजे तरच ग्राहक आपल्याकडे येतो. पेट्रोल पंप असोसिएशनमध्ये स्वामिनी पेट्रोल पंपाचे संचालक प्रशांत यादव नव्याने दाखल होऊनदेखील आदर्श व्यवसाय कसा करावा, हे त्यांनी सिद्ध केले आहे. इथले ग्राहक व नागरिकांकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळाली आहे. तर आता पेट्रोल पंपाच्या सेवेत सीएनजीची भर पडली आहे. ते या व्यवसायात देखील यशस्वी होतील, असा विश्वास कन्सोर्टीयम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स चे अध्यक्ष उदय लोध यांनी कामथे येथे स्वामिनी सीएनजी युनिटच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
कामथे येथे स्वामिनी पेट्रोलियम सीएनजी युनिटचे उद्घाटन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, कन्सोर्टीयम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष उदय लोध यांच्या हस्ते फीत तर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.
यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरीचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण, उद्योजक उदय लोध, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, सुधीरकाका भागवत, बंड्या बोरूकर, छोट्या गवाणकर, महानगर गॅसचे अजित शिंदे, शिवसेना उबाठाचे युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, दळवटणेचे माजी सरपंच सचिन शेट्ये, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, सीएनजी म्हटले की, वाहनांच्या रांगा, असे एक चित्र आपण पाहत आहोत. पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी इंधन आले आहे. तसेच इलेक्ट्रिकल वाहने आली आहेत. पेट्रोल- डिझेलमध्ये बदलते स्वरूप पाहता बदलत्या व्यापाराचे लक्षण आहे. त्याच्यामध्ये सीएनजीचा अंतर्भाव होतो. पेट्रोल पंपांना काम राहणार नाही. मात्र, सीएनजी युनिट टिकतील. सीएनजी इंधन इको फ्रेंडली असून प्रदूषण कमी होते. सीएनजी पंपासमोर ग्राहकांच्या वाढलेल्या मागणीमुळे वाहनांच्या रांगा दिसतात. परंतु, आता महानगर गॅस कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यात वेळेत सीएनजीचा पुरवठा व्हावा, यासाठी पावले उचलली जात आहेत. यामुळे सीएनजी युनिट समोर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, असे लोध यांनी यावेळी स्पष्ट केले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण केली आहे. तसेच स्वामिनी पेट्रोल पंपाला आता सीएनजी युनिटची जोड दिली असून वाहनधारकांसाठी सेवेचे व्रत स्वीकारलेले दिसत आहे. या प्रकल्पांमुळे तरुणांना रोजगार देण्यासाठी झटत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर तुम्हां सर्वांची प्रशांत यादव यांना सामाजिक, राजकीय, व्यवसाय क्षेत्रात भक्कम साथ मिळते आहे, याचे आम्हाला समाधान असून भविष्यात असाच पाठींबा राहू दे, अशी अपेक्षा सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी शेवटी व्यक्त केली.
वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तथा स्वामिनी पेट्रोल पंपाचे संचालक प्रशांत यादव यांनी पेट्रोल व्यवसायातील वाटचालीची माहिती देतांना आता सीएनजी इंधन पुरवठा क्षेत्रात पाऊल टाकलेले आहे. तत्पूर्वी सामाजिक, राजकीय, व्यवसायिक क्षेत्रात जी प्रगती दिसते आहे. ती आपल्या सर्व मंडळींचा हातभार, ज्येष्ठांचे आशीर्वादामुळे दिसते आहे. आपल्या इथे सीएनजी युनिट सुरू करण्यासाठी महानगर गॅस प्रकल्पाने मोठे सहकार्य केले आहे. सीएनजी वाहनधारकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच बाजूच्या प्लॉटमध्ये रेस्टॉरंट सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.
रत्नागिरी महानगर गॅसचे प्रोजेक्ट मॅनेजर अजित शिंदे यांनी सीएनजी युनिट म्हणजे केवळ एक इंधनाचा स्त्रोत नाही तर आपल्या गावाच्या विकासासाठी एक पायरी आहे. इथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. सीएनजी इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात मात्र ही गैरसोय दूर व्हावी यासाठी महानगर गॅसने नवनवीन युनिट सुरू करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. यानुसार स्वामिनी पेट्रोलियम सीएनजी युनिटचा शुभारंभ होत आहे. या युनिटला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
माजी आमदार रमेश कदम, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, माजी नगरसेवक शिरीष काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, देवरुखमधील बंड्या बोरूकर, आदींनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तथा स्वामिनी पेट्रोल पंपाचे संचालक प्रशांत यादव यांच्या व्यवसायिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे भरभरून कौतुक करीत सीएनजीच्या नव्या युनिटच्या शुभारंभाबद्दल शुभेच्छा दिल्या.
चौकट
उद्योजक प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!
स्वामिनी पेट्रोलियम सीएनजी युनिटच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित राहून या पंपाचे संचालक प्रशांत यादव व संचालिका यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये शिवसेना उबाठा नेते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव, उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष सौ. सोनललक्ष्मी घाग,भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिष मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव, शिवसेना उबाठा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, चिपळूण संगमेश्वर समन्वयक राजू देवळेकर, चिपळूण नागरी चे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक अशोक कदम, सोमा गुडेकर, गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, सत्यवान मामुनकर, राजेंद्र पटवर्धन, गणेश खेतले, महादेव खेतले, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक मिलिंद कापडी, निहार गुढेकर, माजी संचालक सतीश खेडेकर, रामचंद्र हरेकर, संतोष होडे, मिलिंद तेटाबे, प्रसाद लाड, सौ. अंजली कदम, सौ. सुप्रिया उतेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्या घोसाळकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस,माजी नगरसेविका सौ. सीमा चाळके, माजी नगरसेवक रतन पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, वासुदेव मेस्त्री, संदीप साळवी, शमून घारे, राकेश दाते, फैसल पिलपिले, गुलजार कुरवले, मंगेश माटे, हरी कासार, तात्या कासार, संकेत शिंदे, अभिनव भुरण, इम्तियाज कडू, श्रीनाथ खेडेकर, रोहन चौधरी, शिवसेना उबाठा माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, सुधीर चव्हाण, प्रकाश साळवी, सुकांत यादव, वृषाली यादव, अजित गुजर, कैसर देसाई, महेश महाडिक, विश्वास कदम, नथुराम रेडीज, संजय पेडणेकर, छोट्या गवाणकर, तेजस शिंदे, बावा चव्हाण, अक्षय केदारी,शिवसेना महिला शहर संघटक वैशाली शिंदे,स्वाती देवळेकर,रहीमत जबले, अंजली कदम,रुही खेडेकर,राधा शिंदे,माजी सभापती धनश्री शिंदे,माजी नगरसेवक इनायत मुकादम, आसिफ मुकादम, विनोद सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक परिमल भोसले, समीर खामकर, मुन्ना थरवळ, कैसर देसाई, विजय कुवळेकर,इसतीयक कापडी,तेजस शिंदे,युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी,संतोष सावंतदेसाई, निलेश भुवड, बाळू शिंदे, विनोद भोबसकर आदीनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामिनी पेट्रोल पंपाच्या संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.