RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

खेड शहरातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा खुर्चीवर बसून देणार नाही ; मनसेचा निर्वाणीचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

  • खेड नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीला आज साडे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या साडेतीन वर्षांमध्ये या खेड शहराची बकाल परिस्थिती झाली आहे. याला सर्वस्वी हे नगर प्रशासन जबाबदार आहे. खेड शहरातुन जाणार भरणे, साखरोली, वाकवली , दापोली रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. खेड शहरातुन जाणार्या रस्त्यामध्ये भलेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संबंधित ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी जी काळजी रस्त्याची घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळे आज भरणे खेड रस्ता धोकादायकस्थित आहे असे मनसेने म्हटले आहे.
याच अनुषंगाने आज खेड मध्ये खेड नगरपरिषदेचे मा नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली , खेड शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था या वर लक्ष वेधण्यासाठी खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श महादेव रोडग यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने या सदर्भात त्वरित कार्यवाही न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसून देणार नाही असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ।दिला आहे.
या प्रसंगी उपस्थित खेड नगरपरिषदेचे मा नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस मा श्री. वैभवजी खेडेकर, मनसे तालुकाध्यक्ष श्री. निलेश बामणे , खेड शहराध्यक्ष श्री. ऋषिकेश कानडे, मा. श्री. भालचंद्र (नंदू) साळवी, म. न. वि. से तालुकाध्यक्ष श्री. गणेश बेलोसे. श्री. स्वरूप माजलेकर, श्री. मिलींद (दादू) नांदगावकर, श्री. राहुल पाटणे, श्री. प्रदीप भोसले, श्री. मनोज दांडेकर, श्री. अंकुश शिंदे, श्री. प्रदीप भोसले, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, श्री. प्रशांत बारटक्के यांच्या सह महाराष्ट्र सैनिक, कार्यकर्त , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.