- चिपळूण – महाविकास आघाडी, चिपळूण वतीने नागरिकांचे हक्क आणि सुविधा यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महावितरणला जाब विचारण्यासाठी उद्या दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता मा. श्री रमेशभाई कदम, नेते (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), मा. श्री प्रशांत यादव, प्रदेश सरचिटणीस (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), मा. श्री प्रतापराव शिंदे, उपजिल्हाप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मा. सौ सोनलक्ष्मी घाग, जिल्हाध्यक्ष (आय काँग्रेस), मा. श्री बाळा कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मा. श्री लियाकत शहा, तालुकाध्यक्ष (आय काँग्रेस), मा. श्री बळीराम गुजर, तालुकाप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मा. श्री मुराद अडरेकर, तालुकाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), मा. श्री संतोष सावंतदेसाई, शहराध्यक्ष (आय काँग्रेस) यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण, चिपळूण ला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय, पॉवर हाऊस, चिपळूण येथे थेट धडक देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरणने दोन दिवसांपूर्वी चिपळूण नगर परिषदेचे थकीत येणे कारण सांगून शहरातील नागरिकांचा विनाकारण विद्युत पुरवठा खंडित करून जाणीवपूर्वक त्रास दिला. हा प्रकार नागरिकांवर अन्याय करणारा असून, चुकीच्या पद्धतीने जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे.
याशिवाय, स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णयही लोकांच्या मनाविरुद्ध सक्तीने लागू करण्याचा प्रकार नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे.
तसेच वारंवार विजपुरवठा खंडित होण्याच्या नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.
या कारणास्तव चिपळूण महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आय काँग्रेस) सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चिपळूणच्या सर्व नागरिकांनी उपस्थितीत रहावे. चिपळूणच्या जनतेचा अपमान सहन केला जाणार नाही. कृपया सज्ज रहा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवूया व आपण एकत्र येऊन महावितरणकडे जाब विचारण्यासाठी एकजूट दाखवूया असे जाहीर आवाहन चिपळूण महाविकास आघाडी तर्फे श्री. बाळा कदम यांनी केले आहे.