RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

भाजप महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणतर्फे सिव्हिल हॉस्पिटलला भेट; कॅन्सर तपासणी कॅम्पसंदर्भात चर्चा

  • रत्नागिरी, – भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या प्रतिनिधींनी आज रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन ब्रेस्ट कॅन्सर व गर्भपिशवीच्या कॅन्सरविषयी माहिती घेतली. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, शहर व जिल्हास्तरावर मोफत तपासणी कॅम्प आयोजित करण्याच्या शक्यतेबाबत हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये तसेच जिल्ह्यात महिलांसाठी मोफत तपासणी कॅम्प घेता येईल का, याबाबत डॉक्टरांना सविस्तर प्रस्ताव मांडला. डॉक्टरांनी यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

या भेटीदरम्यान महिला मोर्चाच्या वतीने अधिकृत निवेदन देखील सादर करण्यात आले. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे महिलांमध्ये कॅन्सरसंबंधी जागरूकता वाढवणे, लवकर निदान व उपचारासाठी मदत करणे, आणि आरोग्यविषयक जनहिताचे कार्य प्रभावीपणे राबवणे हा आहे. महिला मोर्चा लवकरच या संदर्भात तपशीलवार योजना जाहीर करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या वेळी निवेदन देताना या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती :
जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे
सरचिटणीस सौ. नुपूर मुळे,
शहराध्यक्षा सौ. पल्लवी पाटील,तालुकाध्यक्ष सौ. प्रियल जोशी
माजी नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ सौ. प्रणाली रायकर, सौ. भक्ती दळी, सौ. सायली बेर्डे, सौ. वैभवी शिवलकर, सौ. कामना बेग, सौ. मनाली राणे, सौ. सारिका शर्मा

या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांना वेळेत कॅन्सर तपासणीची सुविधा मिळणार आहे. भाजप महिला मोर्चाच्या या सामाजिक भान असलेल्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.