RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

चिपळूण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा होणार गुण गौरव

  • चिपळूण,- चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दरवर्षी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होत असतो याही वर्षी शुक्रवार दिनांक २७ जून रोजी कापसाळ्यातील माटे सभागृहात तालुक्याचे आमदार स्शेखरजी निकम व पक्षाचे विविध प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे उपस्थित संपन्न होणार आहे

यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गामध्ये. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व शंभर टक्के यश संपादित केलेल्या शाळांना ही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष तालुकामध्ये सदरचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवला जातो. या कार्यक्रमाला आमदार शेखरजी निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, प्रदेश चिटणीस जयंद्रथ खाताते, दादासाहेब साळवी, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, मिलिंद कापडी, प्रदेश उपाध्यक्ष पूजा निकम, प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोलकर, मीनल काणेकर, निलेश कदम, जागृती शिंदे, समीर काझी, आदिती देशपांडे, उदय ओतारी,रिया कांबळे,विशाल जानवलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.