- चिपळूण – महाराष्ट्र राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केला ह्या आनंदप्रित्यर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे पक्षातर्फे चिंचनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांच्या घोषनांनी परिसर दणानून सोडला.
शिवसैनिक व मनसैनिकांनी ‘मराठी माणसा जागा हो, महाराष्ट्राचा धागा हो’ असे म्हणत एकमेकांना तसेच नागरिकांना पेढे व लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख श्री बळीराम गुजर म्हणाले की, राज्य सरकारने हिंदी भाषेचा जो जीआर रद्द केला तो समस्त मराठी माणसाचा विजय आहे. शिवसेना व मनसे नेहमीच पक्षहित बाजूला ठेवून कोणताही राजकीय अभिवेश न धरता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी आणि मराठी भाषेसाठी नेहमीच मराठी माणसाच्या सोबत ठामपणे उभी राहिली आहे व यापुढेही अशीच नेहमी सोबत राहील.
मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष नलावडे म्हणाले की, महाराष्ट्रद्वेषी सरकारने मराठी पुसण्याचा किंवा मराठीचे महत्त्व कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो हेतू आम्ही कदापी पूर्ण होऊ देणार नाही.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक राजू देवळेकर, उपशहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, रियान मालदार, विकी नरळकर, राजन खेडेकर, महिला आघाडी शहर संघटक सौ वैशाली शिंदे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपतालुकाप्रमुख सचिन शेटे, विभागप्रमुख शेखर लवेकर, अजित गुजर, अजय भालेकर, माजी नगरसेवक मनोज शिंदे, संदेश किंजलकर, राजू गायकवाड, नितेश चिपळूणकर, प्रमोद गांगण, मनोज पांचाळ, बाबू शिर्के, अनंत खैर, दिनकर जाधव, गणेश खेतले, युवा तालुका सचिव प्रतीक शिंदे, सौ सायली कदम, मेघना शिगवण, आकाश कदम, अथर्व चव्हाण, शुभम शिंदे, सोहम शेलार, सोशल मीडिया तालुका प्रमुख सचिन चोरगे,
तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, तालुकाध्यक्ष संदेश साळवी, शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, उप तालुका अध्यक्ष हमीद सय्यद, प्रणय कदम, ओम गांधी, जय रेळेकर, पुष्कर नारकर, गोरख पाटील तसेच शिवसैनिक व मनसैनिक बहुसंख्य बहुसंख्येने उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या आनंदोत्सव कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.