वर्षभरात अनेक दंत रुग्णांना वाजवी दरात उपचार करून दिला दिलासा
चिपळूण /प्रतिनिधी
- वालावलकर रुग्णालयाचा दंत विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे. या रुग्णालयात अत्यंत वाजवी दरात रुग्णांचा उपचार केला जातो ते पण अत्यंत अत्याधुनिक यंत्राद्वारे.वालावलकर रुग्णालयाच्या दंत विभागात तीन दंत खुरच्या आहेत व सहा दंत चिकित्सक दररोज उपलब्ध असतात यामुळे रुग्णांना फार काळ ताटकळत बसावं लागत नाही. दाताचे उपचार कोणत्याही योजनेत बसत नसल्याने गरीब रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालय तारणहार बनले आहे,कारण इथे अत्यंत वाजवी म्हणजेच कमीत कमी खर्चात चांगले उपचार होतात.
वालावलकर रुग्णालयाच्या दंत विभागात (Extraction)दात काढणे,दाताच्या नसेचा इलाज Root canal), दात साफ करणे (scalling) हे उपचार घेण्यासाठी दररोज अनेक रुग्ण येतात.तसेच दाताला कॅप बसवणे, दातामध्ये सिमेंट किंवा चांदी भरणे हे सुद्धा इलाज इथे होतात. एक्सीडेंट नंतर जर जबडा फाटला असेल किंवा दाताला फ्रॅक्चर झाले असेल तर त्यासाठी देखील दंतचिकित्सक उपलब्ध असतात.
वालावलकर रुग्णालयात डॉ.संगीता,डॉ. दीपक, डॉ. अश्विनी, डॉ. अमृता, डॉ. सेजल व डॉ.गायत्री हे सहा दंतचिकित्सक दररोज उपलब्ध असतात.तसेच डॉ.अग्नी फेशियो मॅक्झेलरी (facio maxillary)सर्जन हे महिन्यातून एकदा येतात.
वालावलकर रुग्णालयाच्या चिपळूण अर्बन हेल्थ सेंटर मध्ये पण डेंटल उपचारासाठी दर रविवारी दंतचिकित्सक उपलब्ध असतात. या रुग्णालयात दाताच्या जटील समस्या जसे की दात पुढे असणे,वेडेवाकडे असणे व लहानपणापासूनच ओठ किंवा टाळू फाटलेला असणे या गोष्टींवर उपचार होतात. वालावलकर रुग्णालयाच्या दंत विभागाने अनेक दंत रुग्णांच्या समस्यांवर इलाज करून त्यांना दिलासा दिला आहे व वर्षभरात हजारो रुग्णांचे उपचार करून दैदिप्यमान कामगिरी केली आहे.