खेड – खेड तालुक्यातील शिवकालीन रसाळगड किल्ल्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या किल्ल्यासाठी कोठावधी रुपयाचे तरतूद करण्यात आली होती परंतु हा खर्च गेला कुठे असा प्रश्न शिवप्रेमी उपस्थित करत आहेत याबाबत शासनाने त्वरित पुरातत्त्व खात्याला आदेश देऊन या किल्ल्याची दुरुस्ती करावी अशी मागण दुर्गसेवक श्री.प्रणव मापुस्कर यांनी वेधले लक्ष.
रसाळगड किल्ल्याची २०२३ पासून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला.मात्र २१ शतक लोटुन ही गडाचे संवर्धन झाले नसल्याचा सूर इतिहास प्रेमींकडून आढळला जात आहे गेल्या २० वर्षात कोट्यावधी रुपयाची कामे झाली.मात्र प्रत्यक्षात गडाची पाहणी केल्यानंतर हा निधी नेमका खर्ची पडला तरी कुठे असा प्रश्न इतिहास प्रेमी समोर उभा टाकला जात आहे.
खेड तालुक्यामध्ये रसाळगड, सुमारगड,महिपत गड अशी अपरिचित दुर्ग खेड तालुक्याला लाभणं म्हणजे आपलं नशीब आहे ऐतिहासिक किल्ले पर्यटकांना आकर्षित करतात. हे किल्ले शिवरायांच्या गनिमी काव्यातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत.मात्र या गडकिल्ल्यांच्या जतन संवर्धनाबाबत शासनाच्या दुरावस्थेमुळे ऐतिहासिक मूल्ये असलेल्या पुरातत्वीय अवशेषांची माती होत आहे त्यातच पुरातत्व विभागाने दर्याहीन कामे करण्याची पद्धत कायम ठेवल्याने कोट्यावधी रुपयाच्या निधीचा चुराडा होत असल्याचा सुर ही इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
सह्याद्रीच्या राकट पर्वत रांगा बसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रसाळगड किल्ला शहरापासून 18 किमी अंतरावर व ५ एकर जागेमध्ये वसलेला आहे. हा किल्ला आजपर्यंत राज्य संरक्षित वास्तु म्हणून शासनाच्या अखत्यारीत आला आहे.उर्वरित महिपतगड व सुमारगड या दोन किल्ल्यांपैकी महिपत गडाला संरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.रसाळगड किल्ल्यावर आजही शिवकालीन मंदिर,दीपमाळ,धान्य कोठार,बालेकिल्ला,मायाबा काळकाई मंदिर,आग्रे कालीन समाधी प्राचीन कालखंडातील गणपती शिल्प असलेले खांबतळे भुयारी व इतर अनेक वास्तु अस्तित्वात आहे.मात्र या सर्व वास्तु ढासळत आहेत.दोन ते तीन वर्षांपूर्वी किल्ल्याच्या महत्त्वाच्या वास्तू असलेल्या धान्य कोठाराची दक्षिणेकडील भिंत कोसळली मात्र त्यांच्या दुरुस्तीसाठी अद्यापही कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. भविष्यात इथे किल्ले होते का असा प्रश्न सांगण्याची वेळ येण्याची भीती देखील निर्माण झाली आहे,छत्रपतींचे अनेक गडकोट आज शेवटची घटका मोजत आहे त्याचे संवर्धन होणे काळाची गरज बनली आहे.शासनाने या किल्ल्याच्या डागडुजीकडे आणि संरक्षणाकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी दुर्ग सेवक प्रणव मापुस्कर यांनी केली आहे