मध्यंतरी मुसळधार पावसामुळे मातीचा ढिगारा कोकण रेल्वे ट्रॅक वर आल्याने तसेच पेडणे बोगद्यात पाणी शिरल्याने कोकण रेल्वेचे वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे सर्व परिस्थितीवर कोकण रेल्वेच्या यंत्रणेचे लक्ष आहे नातूवाडी बोगद्या जवळ करमाळी एक्सप्रेस वेळेत बाहेर न आल्याने व ठरलेल्या वेळेत पुढील स्टेशन पास न केल्याने कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली रत्नागिरी स्थानकांवर पाच वेळा सायरन वाजवण्यात आला आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच ही रेल्वे सुरक्षित रित्या बोगदा पास करून आल्याने सर्वांनी निश्वास सोडला त्याचे असे झालेलोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळीदरम्यान धावणारी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे नातूवाडी बोगद्यानजीक बंद पडली.ती गाडी जवळच्या स्थानकावरून पास न झाल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी रेल्वेस्थानकावर गुरूवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पाचवेळा आपत्कालीन सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा अलर्ट झाली; मात्र थोड्याच वेळात गाडी रवाना झाल्यामुळे यंत्रणेने नि:श्वास सोडला.मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोव्यात करमाळीला जाणारी ही वातानुकूलित एक्स्प्रेस गाडी गुरूवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक असता इंजिनमधील प्रेशर मेन्टेन न झाल्यामुळे गाडी पुढे सरकेनाशी झाली. पुढच्या स्थानकावर तिचा संपर्कही होऊ शकला नाही. अखेर ती ज्या स्थानकावर येणे अपेक्षित होते तिथे न आल्यामुळे बेलापूर येथील कंट्रोल रूमसह रत्नागिरी स्थानकाशी संपर्क करण्यात आला. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरीस्थानकावर भल्या पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पाचवेळा आपत्कालीन सायरन वाजला आणि रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात अशा प्रसंगी नेहमी ‘अलर्ट मोड’वर असणारी आपत्कालीन व्हॅन तातडीने खेड-नातूवाडी बोगद्याच्या दिशेने रवाना झाली. आपत्कालीन व्हॅन भोके रेल्वेस्थानकामध्ये पोचली असेल, नसेल तोपर्यंत गोव्याच्या दिशेने येणारी आणि विण्हेरे ते दिवाणखवटीदरम्यान नातूवाडी बोगद्याजवळ थांबलेली एलटीटी करमाळी एक्स्प्रेस इंजिनमधील तांत्रिक दोष दूर होऊन मार्गस्थ झाली. उपलब्ध माहितीनुसार, इंजिनमध्ये प्रेशरची समस्या उद्भवल्यामुळे काहीवेळ गाडी थांबली होती. प्रेशर व्यवस्थित झाल्यामुळे ही गाडी मार्गस्थ झाली. पहाटेला अचानक सायरनवाजल्यामुळे रत्नागिरी स्थानकावर प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. रेल्वेची आपत्कालीन यंत्रणादेखील तिला मिळालेल्या संदेशानुसार घटनास्थळाकडे जाण्यासाठी रवाना झाली होती; मात्र, काही वेळात सर्व सुरळीत असल्याचे लक्षात येताच यंत्रणेने निःश्वास सोडला.