आर्किटेक्ट सुश्रुत एकांडे यांची चिपळूणमध्ये नवी सुरुवात;
चिपळूण : पुण्यात वास्तुशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर तेथेच अनेक वर्षे वास्तुशास्त्र व बांधकाम क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध प्रकल्पांवर काम करून अनुभव मिळवलेले वास्तुविशारद सुश्रुत एकांडे आता आपल्या मायभूमी चिपळूणमध्येही नव्या प्रवासाला सुरुवात करीत आहेत.पुण्यातील आपले व्यावसायिक कामकाज सुरू ठेवतानाच चिपळूण येथे ‘Sushrut Ekande Architects’ या कार्यालयाचा शुभारंभ २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
चिपळूण शहरातील रावतळे या भागात सुरू होत आहे. पुण्यातील अनुभव आणि आधुनिक वास्तुरचनेचे ज्ञान चिपळूण व कोकणातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे._“पुण्यात काम करताना मिळालेला अनुभव केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता आपल्या चिपळूण आणि कोकणासाठी उपयोगात आणावा, अशी माझी इच्छा होती. आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परिसरासाठी काहीतरी योगदान देता यावे, म्हणून चिपळूणमध्ये कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला,”_असे सुश्रुतएकांडे यांनी सांगितले.‘Sushrut Ekande Architects’च्या माध्यमातून आर्किटेक्चर, इंटेरियर, डिझाईन, बिल्डिंग परवाना, प्लॅनिंग, वास्तू, इ. अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.पुणे आणि चिपळूण या दोन्ही ठिकाणी काम करताना आधुनिक वास्तुकला आणि कोकणची स्थानिक ओळख यांचा सुंदर संगम साधत दर्जेदार वास्तू निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे._“ही केवळ कार्यालयाची सुरुवात नाही; आपल्या मातीला आपल्या अनुभवातून काहीतरी परत देण्याची सुरुवात आहे.”_पत्ता – शॉप 4, वैष्ण विहार, रावतळे, चिपळूण, जि- रत्नागिरी— सुश्रुत एकांडे, वास्तुविशारद