Successful persons don’t do different things, they do thing differently
“यशस्वी व्यक्तिमत्व वेगळ्या गोष्टी करत नाही ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात”
इंग्रजीमध्ये असलेल्या हा विचार आपल्या जीवनातील यशस्वीतेचा एक चांगलं सूत्र सूचित करतो.अशी थोडीच माणसं समाजामध्ये आहे ती या पद्धतीने आपले काम करत असतात आणि समाजामध्ये आपला प्रभाव टाकतात ज्यामध्ये आपल्या शहरातील सर्वांचीच एक आवडते व्यक्तिमत्व डॉक्टर यतीन जाधव यांचे नाव निश्चितच घ्यावा लागेल
गेले जवळपास २६ वर्ष कोकणातील त्वचाविकार चिकित्सक व सौंदर उपचार विशेषतज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे व महाराष्ट्रातही ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने कोकणचे नाव सार्थ केले आहे असे आमचे मित्र डॉक्टर यतीन जाधव यांचा आज वाढदिवस. चिपळूण शहरांमध्ये काही व्यक्ती या अजातशत्रू आहेत. त्यांचे अनेक लोकांशी मित्रत्वाचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत अशा अशा व्यक्तींमध्ये डॉक्टर यतीन जाधव यांचा निश्चितच समावेश होतो. अर्थात जवळपास सर्वच क्षेत्रात जाधव यांचे नाव आहे. मुळातच डॉक्टर असलेली व्यक्ती काहीशी रुक्ष आणि आपल्याच व्यवसायामध्ये गुंतलेली असते किंबहुना त्यांना वेळच नसतो. वैद्यकीय व्यवसाय हा तसा ताण तणावाचा आणि खूपच व्यस्त असलेला पेशा आहे. त्यातून एखादी या व्यवसायातील व्यक्ती वेळ काढून समाजासाठी काही करण्यासाठी धडपडत असेल तर त्याचं कौतुक व्हायलाच हवं. डॉक्टर यतीन जाधव यांचं सौंदर्य उपचार तज्ञ म्हणून महाराष्ट्रात नाव आहे आणि प्रचंड अनुभवी त्वचाविकार तज्ञ म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. डॉक्टर यतीन जाधव हे प्रचंड व्यस्त असलेल्या व्यक्तिमत्व आहे. व्यवसाय निमित्ताने त्यांच्या देशा परदेशात अनेक दौरे असतात. या दौऱ्यांमध्ये त्यांच्या क्षेत्राशी निगडीत भेटीगाठी आणि कॉन्फरन्सेस होत असतात. त्याचबरोबर अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची त्यांनी निर्मिती केली आणि त्यांचा व्याप अनेक पटीने वाढला. कोकणातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसेवेमध्ये या अपरान्त हॉस्पिटल चा समावेश होतो. ही खरी संकल्पना डॉक्टर यतीन जाधव आणि त्यांच्या निवडक मित्रांची. यतीन जाधव यांनी मनावर घेतले आणि अपरांत हॉस्पिटलची निर्मिती झाली.आपल्या येथील लोकांना मोठ्या उपचारासाठी बाहेरगावी जाता लागू नये या प्रामाणिक भावनेतून त्याने गुणवत्तापूर्वक वैद्यकीय सेवा देण्याचे ठरवले. अत्यंत अद्यावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलचा मोठा डोलारा सांभाळण्याचा आव्हान डॉक्टर येथील जाधव यांच्यावर आहे व ते आपल्या कौशल्याने ह्या सर्व गोष्टी हाताळत आहेत. मात्र त्याच बरोबर डॉक्टर यतीन जाधव यांनी आपलं सामाजिकदायित्व आणि बांधिलकी फार कसोशीने जपली आहे आणि जपत आहेत. साहित्य, कला, क्रीडा आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. फिटनेससाठी एखादी सायकलिंगची स्पर्धा असो, आरोग्य शिबिर असो, साहित्य क्षेत्रातील चर्चा अथवा कार्यक्रम असो किंवा एखाद्या सामाजिक मंडळांमध्ये आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग असो डॉक्टर यतीन जाधव हे नाव निश्चितच त्यामध्ये समाविष्ट असते. केवळ त्यांचा सहभाग नसतो तर अनेक संस्थांना मंडळांना किंवा ग्रुपला त्यांची मदत होत असते ते नेहमीच अशा सामाजिक उपक्रमांना आपली दानशूरता जपत मदत करत असतात. त्यामुळेच अनेक संस्थांवर त्यांचे नाव आहे ज्यामध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदीररचे अध्यक्षपद, सांजसोबतचे अध्यक्षपद, डॉक्टर यतीन जाधव हे चिपळूण शहर आणि कोकणातल्या अनेक संस्थांवर सक्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या सर्व पदांना आणि सन्मानाला न्याय दिलेला आहे व देत आहेत. खरंतर याला बहुआयामी ( versatile personality) व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. त्यांच्या या सामाजिक , साहित्य, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीने आणि सामाजिक दायित्वाची प्रामाणिक भूमिका पाहूनच अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. यामध्ये प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट, मराठा भूषण, कोविड सेवा पुरस्कार आयडियल महाराष्ट्र पुरस्कार, आरोग्य सेवा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील ही त्यांच्या संशोधनाबद्दल व कामगिरीबद्दल देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. यतीन हे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समितीवर सदस्य व निमंत्रक म्हणून काम करत आहेत ही सुद्धा कोकणवासियांना अभिमानाचीच बाब आहे. मात्र हे सर्व कार्य करत असताना त्यांनी आपला ग्राउंड बेस सोडला नाही. स्वभावात कधीच बदल केला नाही. हसतमुख आणि आपल्या समोरच्या व्यक्तीमत्त्वाला तेवढाच सन्मान देण्याचा त्यांचा स्वभाव निश्चितच सर्वांना भावतो. डॉक्टर हा स्वतः आनंदी असला आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला तर तो आपल्या पेशंटला निम्मा बरा करतो हे मानसशास्त्र आहे. डॉक्टर यतीन जाधव यांचा स्वभावाचा मूळ स्त्रोत हाच आहे. ते कधी कोणावर रागावलेले चिडलेले किंवा वैतागलेले दिसलेले नाहीत. त्यांचा आवाज कधी चढलेला कोणी पाहिला नाही. कदाचित त्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाचं हेच गमक असावं.चिपळूण मध्ये ‘स्प्रिंग क्लिनिंग’ हे त्यांचे अद्यावत त्वचा विकार व सौंदर्य उपचार क्लीनिक आहे.या क्लिनिकची रचना सुद्धा छान केलेली आहे की, येणाऱ्या पेशंटला सुद्धा मानसिक रिलॅक्स अनुभवता येतो. आणि वृत्तपत्रे साहित्य या ठिकाणी ठेवलेले आहे. डॉक्टर जाधव यांनी आपल्या सर्व कर्मचारीवर्गाला पेशंट शी बोलताना कसे आदमीने आणि शांतपणे बोलावे हेही सांगितलेला आहे असेच ट्रीटमेंट हे अपरांतलाही मिळते. सांगायचा मुद्दा असा आहे की, मनाची गुणवत्ता ही व्यावसायिक गुणवत्तेत उतरली की सर्व गोष्टी या खूपच छान आणि सुंदर होतात. माणसाच्या व्यक्तिमत्वात जर असे छान आणि सुंदर गुण असतील ते सर्वत्र प्रतिबिंबत होतात. चिपळूण शहर किंबहुना कोकणला आपल्या कर्तुत्वाने एका उंचीवर नेण्याचे प्रयत्न आपल्या कामगिरीने कर्तुत्वाने अनेकांनी केले आहे यामध्ये डॉक्टर यतीन जाधव यांचे नाव त्यामध्ये निश्चितच आहे याबद्दल संदेह नाही. राजकारणा पलीकडे जाऊन सेवाभावी वृत्ती कशी जपावी याचे उत्तम उदाहरण डॉक्टर जाधव आहेत. सर्व समावेशक आणि सर्वांना आवडेल असं आपलं व्यक्तिमत्व घडवणं इतकं सोपं नाही. हल्लीच्या काळामध्ये सुद्धा ते फारच अवघड आहे. मात्र तरीही यतीन यांच्यासारख्या व्यक्तिमत्व हे सहज करू शकतात कारणच मुळातच अशा व्यक्तिमत्त्वांचा स्वभाव आणि मन सुंदर असतं. मनाने स्वच्छ आणि निर्मळ असणारी माणसं कुठेही उठून दिसतात आणि आपल्या कामगिरीने समाजामध्ये छाप पाडतात. त्यासाठी फार मोठे वेगळे करावा लागत नाही. मन जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर सर्व गोष्टी या चांगल्याच घडतात. मला असं वाटतं की डॉक्टर यतीन जाधव यांच्यासारखी व्यक्तिमत्व ही एक उत्तम उदाहरण आहेत त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोकण एक्सप्रेस परिवार तसेच हेल्प फाउंडेशन चिपळूण आणि समस्त चिपळूणकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सतीश कदम
संपादक कोकण एक्सप्रेस