अनेक स्टॉल्स :खाद्यपदार्थांची रेलचेल आणि मनोरंजन व गेम्स
चिपळूण – उन्हाळी सुट्टी चांगल्या पद्धतीने एन्जॉय करण्यासाठी चिपळूण येथील मनाली फाऊंडेशन आयोजित सह्याद्री फेस्टिव्हलचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. हा फेस्टिव्हल चिपळूण तालुक्यातील सर्वच नागरिकांना एक मेजवानीच ठरणार आहे. सर्व प्रकारचे स्टॉल्स ज्यामध्ये खाद्यपदार्थ आयुर्वेदिक औषधे, मसाले, शोभेच्या वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, कोकणी पदार्थ व वस्तू आदी अनेक स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत तसेच लहान मुलांना खुप छान गेम्स उपलब्ध आहेत. जवळपास दहा दिवस हा फेस्टिव्हल चालणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी फेस्टिवल चे आयोजक मनोज जाधव सचिन पाटेकर व फाउंडेशनचे अध्यक्ष मनाली जाधव यांनी केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती तसेच रा.कॉं.प्रदेश उपाध्यक्ष पूजा ताई निकम, रा.कॉं.प्रदेश सरचिटणीस अणि रत्नागिरी जिल्हा बँक संचालिका दिशा ताई दाभोळकर, आयोजकां व रा.कॉं.क्षेत्राअध्यक्ष मनाली ताई जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रवीना ताई गुजर, तालुका उपाध्यक्षा पूनम ताई भोजने, तालुका सचिव पूर्वा ताई आयरे, भाजप च्या श्रद्धा ताई कदम, राणी ताई महाडिक तसेच प्रदेश सचिव जयंत शेठ खाताते ,शहर अध्यक्ष मिलिंद शेठ कापडी, फेस्टिव्हल चे आयोजक मनोज दादा जाधव तसेच सचिन दादा पाटेकर, राधा शिंदे प्राजक्ता टाकळे, स्नेहल चव्हाण, इमरान खतीब, बरकत पाते, समीर काझी, जहीर कुंडलीक, अल्हाद यादव आदी उपस्थित होते.