खेर्डी – गेली 40 वर्ष खेर्डी MIDC मधील जुन्या कोकण स्टिल च्या जागेत हे सूर्यमुखी हनुमान मंदिर आहे.ज्याची गेली.कित्येक वर्षं येथील मंदिराचे पुजारी कळकुटकी पुजारी पूजा अर्चा करून सेवा करत आहेत.आणि दरवर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहेत.गेली दोन वर्षे सकाळी गुड मॉर्निंग ग्रुप चे सदस्य चालायला जात असताना, अस जाणवलं की या मंदिराचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे.त्या दृष्टीने गेल्या वर्षीपासून त्याची तयारी चालू केली.गेल्यावर्षी पासून गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून हनुमान जयंती साजरी करण्याचं काम चालू केरण्यात आले व आणि त्यासाठी सर्वांच सहकार्य देखील लाभलं.गेल्या वर्षी हनुमान जयंतीला गुड मॉर्निंग ग्रुप ने संकल्प सोडला की, पुढच्या वर्षी हनुमान जयंतीच्या आधी या मंदिराच सुशोभिकरण करण्याचं आणि त्याप्रमाणे यावर्षी मंदिरं पूर्णपणे सुशोभीकरण करून तयार करण्यात आले आहे.सुशोभीकरणासाठी खेर्डीचे माजी सरपंच दशरथ शेठ दाभोळकर आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी खेर्डीचे दानशूर व्यक्ती श्री अनिलशेठ दाभोळकर यांच्या कडे मागणी केली असता त्यांनी मंदिराच्या शेड साठी लागणारे स्टील देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली बघता बघता काम चालू झाल्यावर देखील काही व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली आणि एक देखणं मंदिर आज खेर्डी MIDC येथे उभे राहील आहे.त्यासाठी गूड मॉर्निंग ग्रुपचे उद्योजक अनिल शेठ दाभोळकर,संदीप सुर्वे,सुनील सागवेकर,विकास ढवण सर, धनंजय दाभोळकर,राकेश दाभोळकर,आबा पाटील,बाळा साळुंखे,सचिन भोसले,विवेक दाभोळकर,अविनाश उतेकर, बाळू कदम,संभाजी यादव,अभिजीत यादव ,शशांक भिंगारे,रियाज खेरडकर ,साईराज सावंत,दिनेश माटे,भाऊ देवरुखकर,रुपेश वाडकर,हनुमंत घोसे , बापू थरवळ,वैभव गुरव,चिन्मय दाभोळकर,सोहम दाभोळकर,किरण मर्ये,अक्षय यादव,ओंकार मोरे,कन्हैया मेस्त्री,नंदकुमार ठोकले,सुरज सावर्डेकर,ओंकार भूरन,सम्राट भोसले,निरंजन डोंगळे,युवराज कवडे,विश्वनाथ शेट्ये,आदी कार्यकर्ते त्यासाठी मेहनत घेत आहेत. गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून गेली 2 वर्ष खेर्डी MIDC मध्ये 200 झाडे लावण्यात आली.नाना शेंबेकर,मेहता,शशिकांत खेडकर,पांडुरंग पाटील,पाटेकर,सूर्यवंशी,नाना जोशी,प्रकाश जंगम आदी ग्रामस्थ देखील या मंदिराच्या उपक्रमात सहभागी असतात.ज्येष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी सिंमेट चे बेंच बसविण्यात आले आहेततसेच शिवजयंती,गुढीपाडवा असे विविध कार्यक्रम राबवित असतात.भविष्यात देखील सकाळी चालायला येणाऱ्या लोकांसाठी विविध उपक्रम राबवायचा मानस आहे. दशरथ शेठ दाभोळकर यांच्या संकल्पनेतून 40 जण एकत्र आणून गुड मॉर्निंग ग्रुप स्थापन केला आहे.गुड मॉर्निंग ग्रुप सामाजिक बांधिलकी जपून विविध उपक्रम राबविणार आहे.याच ग्रुपच्या माध्यमातून यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.यावर्षी देखील शनिवार दिनांक १२/४/२०२५ रोजी जन्मकाळ आणि रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरीही खेर्डीतील जास्तीत जास्त नागरिकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे