RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

रमेश कदमांची शिवसेनेत ‘एंन्ट्री ‘ होणार

चिपळूण – ‘मी पंधरा दिवस शांत राहणार आहे ‘ असे जाहीर करणारे माजी आमदार रमेश कदम हे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातील चर्चा आणि बैठका झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

चिपळूण नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या आणि पराभूत झालेल्या रमेशराव कदम यांनी अचानक आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आल्याने आल्यानंतर खळबळ उडाली. परंतु रमेशराव कदम यांचे हे सर्व राजकीय प्लॅन अगोदरच ठरले होते. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचे माहिती आहे. रमेशरावांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली व नंतर उदय सामंत यांनी रमेशराव कदम यांना मुंबईत बोलावून घेतल्याचेही वृत्त आहे. पालकमंत्री उदय संबंध हे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरपासूनच रमेशराव कदम यांच्या संपर्कात होते किंबहुना त्यांची यावेळी अनेक वेळा भेट झाली होती उदय सामंत हे त्याचवेळी रमेश कदमांना पक्षामध्ये सहभागी करून घेणार होते परंतु मिळालेल्या माहितीनुसार रमेशराव कदम हे निवडणुकीनंतर आपण जिंकून आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत येऊ असे सांगितलेचे कळते. आत्ता जर मी शिवसेनेत आलो तर राजकीय समीकरणे बदलतील आणि त्याचा फटका बसू शकतो अशी ही त्यांना भीती होती परंतु त्यांचा पराभव झाल्याच व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार जागा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला फार राजकीय भवितव्य नसल्याचे दिसून आल्यानंतर आता उदय सामंत यांच्या सल्ल्यानुसार शिवसेनेत जातील अशी शक्यता आहे. याबाबत त्यांचा खेर्डीतील एक विश्वासू सहकारी उदय सामंत यांना भेटला होता व त्यानंतर बैठक झाल्याची कळते.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.