RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भाजप व झेप फाउंडेशनच्या वतीने भाविकांना सरबत वाटप

रत्नागिरी – कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहर मंडळ तसेच झेप फाउंडेशन (सामाजिक व शैक्षणिक संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सरबत वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे पाच ते सहा हजार भाविकांना सरबताचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.


कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळावा आणि सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी झेप फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश युवा सचिव अद्वैत कुलकर्णी, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, संतोष सावंत, निलेश आखाडे, विजय माळवदे, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी, सारिका शर्मा, मंदार भोळे, शैलेश बेर्डे, नरेंद्र कदम, प्रीती शिंदे, सिद्धेश नाईक, प्रशांत गावखडकर, प्रणाली शिंदे, प्राजक्ता भोसले, नील ढेकणे आणि अक्षय खाकोडिया यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची सेवा करण्याचा आनंद मिळाला असून, समाजहिताचे असे उपक्रम झेप फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील , असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.