RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

मुलांना चुकीची अटक केल्याचा दावा ; तीन मुलांच्या आई, कुटुंबीयांसह पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसणार

मुख्यसंशयित वाढदिवसाच्या दिवशी चिपळूणात फिरत होता – शहानवाज शहा

चिपळूण – परशुराम घाटात गाडीवर हल्ला करून काहीजणांना मारहाण केल्याप्रकरणी आमच्या तीन निरपराध मुलांना चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे आमची मुले निरपराध आहेत व त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सहा फेब्रुवारीपासून चिपळूणच्या डीवायएसपी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत असे नफीसा इनामदार , अनिसा अलवारी, झरीना दळवी या तिघींनी पत्रकार परिषदेत जाहीर केले असून त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते व या कुटुंबाचे नातेवाईक शहानवाज शहा व काही संस्था उपोषणाला बसणार आहेत

दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री दहा वाजता परशुराम घाटात एका गाडीवर हल्ला करून काही लोकांना जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी दहा संशयित असून निहाल सईद अलवारे, शहाबाद सिद्दिकी दळवी व मुजफ्फर इनामदार या तिघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली होती. बाकी आरोपी फरार आहेत यातील काही जणांना अँटीसिपेटरी बेल झाला आहे.

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शहा यांनी चिपळूण पोलीस स्टेशनला वारंवार संपर्क करून ह्या आमच्या नातेवाईकांच्या मुलांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना दाखवली परंतु फिर्यादींनीच ही नावे पोलिसांना दिल्याचा पोलीस स्टेशनचा दावा आहे. अद्यापही या मुलांना जामीन झालेला नाही. या मुलांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे ही आमची मुले निरपराध आहेत असा दावा या कुटुंबीयांनी केला असून शहानवाज शहा यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपण उपोषणात बसणार आहोत असे जाहीर केले.

या घटनेचा मुख्य सूत्रधार व मुख्य संशयित हा चिपळूणमध्ये वाढदिवसाच्यासाठी आला होता व या अगोदरही आला होता असाही दावा शहा यांनी पत्रकार परिषदेत केला. या घटनेला ५५ दिवस उलटूनही पोलीस फरार संशयिताना अटक करू शकले नाहीत व त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या आमच्या मुलांनाही जामीन मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली या पत्रकार परिषद बोलताना शहानवाज शहा यांनी सीसीटीव्ही फुटेज ,मुलांचे मोबाईल लोकेशन तसेच ते घटनास्थळी होते का याचा तपास पोलिसांनी अद का केला नाही तसेच अटक करताना त्यांच्या आईशी व कुटुंबाशी का बोलणे केले नाही असाही सवाल शहानवाज शहा यांनी उपस्थित केला. या संदर्भात आता चिपळूण पोलीस काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

betplay

Ultra Peak XL