तिघांविरोधात शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
चिपळूण – चिपळूण तालुक्यातील आकले या गावी नदीतील वाळू बेकायदेशीर काढणे व ती नेण्याचा प्रयत्न करणे तसेच पोलीस पाटलास दुखापत होईल हे माहीत असून सुद्धा भरधाव जेसीबी नेऊन दुखापत करण्याचा इराद्याने चालवणे अशा गुन्ह्यांसाठी तसेच गौण खनिजचे बेकायदेशीर उत्खननाप्रकरणी रविंद्र भाताडे २) ट्रॅक्टर व ट्रॉली व जेसीबी नं.एम.एच.०८-ए.एक्स-६४६७ वरिल चालक वय अंदाजे ३० वर्षे. (नाव गाव माहित नाही) यांच्यावर शिरगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दिनांक २३/०१/२०२५ रोजी १४.१५ वा.ते २०.३० वाजताचे सुमारास आकले गावी तिवरेकडून येणा-या नदीत जुना यडेवाडी सहा ता.चिपळूण जि.रत्नागिरी, येथे संशयितांनी यांनी एकमेकांच्या संगणमताने व सहाय्याने विना परवाना बेकायदेशिरपणे गौण खनिजांचे उत्खनन करुन सदर नदीतील वाळु चोरीचा प्रयत्न केला असून जेसीबी चालक याने जेसीबीचा चक्का लागून पोलीस पाटील सुरेश कदम यांना दुखापत होवू शकते याची जाणीच असताना देखील ताब्यातील जेसीबी भरधाव वेगाने चालवून तेथून निघुन गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला व याबाबत रत्नागिरी पोलीस मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली त्यानुसार गुर.नं. ०५/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम, ३०३(२),६२,१२५, ३(५), गौणखनिज अधिनियमचे कलम २५(४) (४) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे