RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समिती बैठक भाट्यात हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, 25 कोटीतून मत्स्यालय

रत्नागिरी, (जिमाका):- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे प्रक्रिया उद्योग 25 बचतगटांच्या क्लस्टरमार्फत उभारला जाईल. 25 कोटींचे मत्स्यालय उभारताना ते पर्यटनस्थळ व्हावे, अशा पध्दतीचा चांगला प्रस्ताव तयार करावा, असे सांगतानाच नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षणावर भर देणारे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समितीची आज बैठक झाली. बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार विनय नातू, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मागील वेळच्या सिंधुरत्न योजनेमधून झालेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्या यंत्रणेकडे किती निधी आहे, कोणती कामे पूर्ण झाली, अपूर्ण कामांची कारणे व सद्यस्थिती याबाबतची माहिती यात होती. ते पुढे म्हणाले, या आढाव्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन देणारा बांबू शेतकऱ्यांना देण्यात यावा. त्यासाठी संशोधन व सुविधा केंद्र व्हायला हवे. काजू बोंडापासून पक्रिया उद्योगातून ज्यूस, सिरप विविध उत्पादने तयार करण्याचे प्रकल्प होवू शकतात. सीएमईजीपीच्या माध्यमातून 35 टक्के सबसिडी दिली जाते. 25 बचतगटांचा क्लस्टर करुन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, सिंधुरत्न योजना आणि सीएमईजीपी च्या माध्यमातून अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर सादरीकरण करा. वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त पोहोचल्या पाहिजेत तसे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार करावेत.
भाट्ये येथे टर्मिनल तयार करुन हाऊस बोट प्रकल्प चालविला जाईल. त्यामधून मिळणारा नफा हा प्रभाग संघाना दिला जाईल. मत्स्यालय हे पर्यटन स्थळ झाले पाहिजे, अशा पध्दतीने अतिशय चांगला प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी 25 कोटी रुपये दिले जातील.
नाविन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव तयार करताना अधिकाऱ्यांनी आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षण यावर अधिक भर द्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले.
बैठकीला विविध विभागाचे प्रमुख आधिकारी उपस्थित होते.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.