/ Sep 11, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

वर्षाताई ढेकणे व दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेतील सर्व कामगारांना गणेशोत्सव किटचे वाटप

रत्नागिरी स्वच्छ-सुंदर ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची प्रेमाची भेट!

रत्नागिरी – शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेतील कंत्राटी तसेच कायमस्वरूपी कामगारांचा गणेशोत्सवानिमित्त आपुलकीने सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या वतीने नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग, पाणी विभाग तसेच नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पुरुष स्त्री कामगारांना गणेशोत्सव किट भेट म्हणून देण्यात आले.

शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल, बांधकाम तसेच नागरिकांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित विविध कामे हे कामगार सातत्याने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच रत्नागिरी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठी मदत होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात या कष्टकरी हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच गणेशोत्सव किटची भेट मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या भेटीबद्दल कामगारांनी वर्षाताई ढेकणे व दादा ढेकणे यांचे मनापासून आभार मानले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, गटनेते राजू तोडणकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेविका मानसी करमरकर, नगरसेवक संदीप सुर्वे आणि नगरसेवक नितीन जाधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगरपरिषद कामगारांच्या मेहनतीचे कौतुक करत, “शहराच्या विकासामध्ये आणि स्वच्छतेमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या कामगारांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या आनंदात त्यांचाही सहभाग असावा, या भावनेतून हा छोटासा प्रयत्न करण्यात आला,” अशी भावना व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात रत्नागिरी शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने झटणाऱ्या कष्टकरी हातांचा झालेला हा सन्मान आपुलकी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा ठरला.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.