चाकरमान्यांसाठी गेली पाच वर्षे फूड पॅकेटची व्यवस्था
गुहागर – गेली पाच वर्षे गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एस.टी. बसच्या चालक व वाहक बांधवांसाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे.
यावर्षीही हा सेवाभावी उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या एस.टी. महामंडळातील चालक व वाहक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांना अल्पोपहार व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सेवेला सन्मान देत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला.या प्रसंगी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गुहागर एस.टी. आगाराचे व्यवस्थापक, तसेच लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष, सचिव, सर्व लायन्स पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गणरायाच्या आशीर्वादाने सेवा कार्याची ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना! लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी We Serve – आम्ही सेवेसाठी सदैव तत्पर!