RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

मिरजोळा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान; सेवा पंधरवड्याला उत्स्फूर्त सुरुवात

रत्नागिरी -भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या सन्मान व सत्काराची सुरुवात आज मिरजोळा येथील अंगणवाडी केंद्रातून करण्यात आली.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, मंडलाध्यक्ष सुचिता नाचणकर, अनुश्री आपटे, सचिव मेधा देवस्थळी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, गंधाली शेलार तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. वर्षा ढेकणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची आणि विकासकामांची माहिती दिली. महिला सक्षमीकरण, गरीब व वंचित घटकांसाठीच्या योजना, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.“अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या समाजाच्या भविष्यातील पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे,” असे वर्षा ढेकणे यांनी सांगितले.सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सेवा, सन्मान आणि जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार असून, मिरजोळा येथून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सन्मानाला सुरुवात झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.