RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

चिपळूण नागरी तर्फे ९ जून रोजी संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा

मिशन २०२६ चे उद्दिष्ट सभासदांसमोर ठेवले जाणार!

चिपळूण (प्रतिनिधी):- चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सोमवार दिनांक ९ जून रोजी सकाळी १० वाजता चिपळूण बहादूरशेख नाका येथे संस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त व आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या संकल्प मेळाव्यात संस्थेतर्फे ‘मिशन २०२६” चे उद्दिष्ट ठेवले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी दिली.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवसायिकता सांभाळीत असतानाच गरजू, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे. तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जात आहे.

चिपळूण नागरीच्या ५० शाखांच्या माध्यमातून ३२ वर्षे आर्थिक व्यावसायिकता संभाळताना- पारदर्शक कारभार पाहताना दि. ३१ मार्च २०२५ सभासद संख्या १ लाख ४६ हजार ६८२, भाग भांडवल ७६ कोटी ३७ लाख (एवढे मोठी भागभांडवल असणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था), स्वनिधी १६१ कोटी ५४ लाख, ठेवी ११३२ कोटी १२ लाख, कर्जे ९८३ कोटी ३३ लाख एकूण व्यवसाय २११५ कोटी ४५ लाख, गुंतवणुका २९० कोटी ४३ लाख, मालमत्ता ३९ कोटी ३० लाख, ढोबळ नफा ३९ कोटी २५ लाख रुपये इतका आहे.

तसेच चिपळूण नागरीने सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त, बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दाम दुप्पट, दाम तिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. ३२ वर्षाची चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल अखंड सुरू आहे.

तर आता चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सोमवार दिनांक ९ जून रोजी संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या संकल्प मेळाव्यात संस्थेतर्फे मिशन २०२६ चे उद्दिष्ट सभासदांसमोर ठेवले जाणार आहे. यामध्ये ८० कोटी भाग भांडवल, ९५ कोटी निधी, १७५ कोटी एकूण स्वनिधी, १ हजार २२५ कोटी एकूण ठेवी, १ हजार ५० कोटी एकूण कर्जे, २ हजार २७५ कोटी एकूण व्यवसाय तर ५० कोटी एकूण नफाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. तरी या संकल्प मेळावा व कार्यशाळेला सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.