RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेतर्फे पिंपळीखुर्द येथे वृक्षारोपण

चिपळूण (प्रतिनिधी):– तुम्हाला मायेची ऊब हवी असेल तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे, कारण पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी पिंपळीखुर्द येथील श्री ग्रामदैवत केदार सुकाई मंदिर प्रवेशद्वारासमोर ५७ प्रकारच्या आयुर्वेदिक वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., वाशिष्ठी पंचक्रोशी सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था मर्या. पिंपळी, जिल्हा निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी, चिपळूण तालुका स्वयंरोजगार सेवा उद्योग सहकारी संस्था मर्यादित, चिपळूण. या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ एक पेड मेरे माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत पिंपळी खुर्द येथील श्री ग्रामदैवत केदार सुकाई मंदिर प्रवेशद्वारासमोर रविवारी ५७ प्रकारचे आयुर्वेदिक वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कदंब, अर्जुन , वड, पिंपळ, कडुलिंब तसेच आंबा, काजू, जांभुळ, चिंच, आवळा या झाडांचा समावेश आहे.

यावेळी या वृक्षारोपण उपक्रमाविषयी आपली भूमिका मांडताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी तुम्हाला मायेची हवी असेल तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयांनी एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माँ के नाम’ ही संकल्पना राबवण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही असे सांगितले.

यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, जिल्हा निबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सौ. प्रियांका माने, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, पिंपळीखुर्द सरपंच अंजली जांबुर्गे, सदस्य रवींद्र सागवेकर, दादा देवरुखकर, पोलिस पाटील दीपाली भाबल, हरिश्चंद्र चव्हाण, सदानंद कडव, चिपळूण नागरीचे संचालक रवींद्र भोसले, गुलाब सुर्वे, मनोहर मोहिते, राजेंद्र पटवर्धन, संचालिका ऍड. नयन पवार, नीलिमा जगताप, सौ. तृप्ती यादव, कु. स्वामिनी यादव, जनार्दन पवार, डॉ. सुनील सावंत, वासुदेव मेस्त्री, मुन्ना दळी,रमण डांगे, वाशिष्ठी डेअरीचे मॅनेजर प्रदीप मगदूम, लक्ष्मण खरात, विजय वाजे माजी नगरसेवक राजू देवळेकर, राहुल लोटेकर, तर चिपळूण नागरीचे प्रशांत वाजे, महेश खेतले, अविनाश गुढेकर, संदीप पाटील, तसेच सौ. अंजली कदम, सौ. मनिषा पवार, पद्मा ओली आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरीच्या कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण नागरीचे अन्य अधिकारी तसेच वाशिष्ठी डेअरीचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत केली.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.