RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

अपरांत हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च ते १४ मार्च या कालावधीमध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या तपासणीमध्ये इसीजी, ब्लड प्रेशर, शुगर, या चाचण्या मोफत करण्यात येणार असून रक्त चाचण्यावर 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी, सोनोमॅमोग्राफी,आणि पॅप स्मिअर या चाचण्यांवर 50% सवलत देण्यात येणार आहे. महिलांची तपासणी अपरांत हॉस्पिटलच्या मिरज येथे शिकलेल्या प्रख्यात सर्जन डॉ. भक्ती पालांडे यांचे द्वारे करण्यात येणार आहे.
महिला आपले कुटुंब व त्या संदर्भातील जबाबदाऱ्या यामध्ये सतत व्यस्त राहत असून त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी डायबिटीस,बीपी, हृदयरोग, कॅल्शियमची कमतरता, अकाली वृद्धत्व, पाळीच्या समस्या, सांधेदुखी, गर्भाशयाचे व स्तनाचे विकार यासारख्या व्याधी जडतात या परिस्थितीचा विचार करून व महिलांनी आपल्या आरोग्य प्रती जागरूक राहावे व त्यांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम अपरांत हॉस्पिटल द्वारे राबविण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामध्ये कोणत्याही महिलेला आपले आरोग्य तपासणी करून घेण्यात येणार डॉ.भक्ती पालांडे यांचा मिरज व मुंबई यासारख्या ठिकाणचा अनुभव उपयोगी पडणार असून जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अपरांत हॉस्पिटल प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.


admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews