/ Oct 07, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

येथे विकसित भारत संकल्प सभा-सेवा ज्योती यात्रा कार्यक्रम संपन्न

‘विकास देशाचा, विकास कोकणचा, विकास माझ्या गावचा!’ आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना विकासाचा मंत्र

  • खेड : ‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या संकल्पनेतून आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण खेड येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पाहण्यात आले. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गावाच्या विकासाचा ठोस आराखडा तयार करून तो प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन केले.

यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

आमदार प्रमोद जठार म्हणाले, “प्रथम आपल्या गावाच्या विकासाचा संकल्प करा. सामान्य नागरिकांचा विकास झाला पाहिजे, तरच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. प्रत्येक गावातील भाजपा कार्यकर्त्याचे घर हे जनतेसाठी कार्यालय झाले पाहिजे. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात पोहोचा, समस्या जाणून घ्या आणि गावाच्या विकासाचा प्लॅन तयार करा,” असे आवाहन त्यांनी केले.

“विकास देशाचा, विकास कोकणचा आणि विकास माझ्या गावचा,” हा मंत्र देत जठार यांनी कार्यकर्त्यांनी केवळ संघटनात्मक कामापुरते मर्यादित न राहता गावातील मूलभूत प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.

यावेळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते वैभव खेडेकर, गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, युवामोर्चा प्रदेश सचिव मिलिंद नांदगावकर, पदवीधर प्रदेश सचिव अजय दळवी, खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषीकेश मोरे, धनंजय यादव, खेड नगरसेविका वैभवी खेडेकर, दापोली शहर मंडल अध्यक्ष जया साळवी, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगुडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

avrupabet

avrupabet

avrupabet

avrupabet