चिपळूण (प्रतिनिधी) : त्वचाविकार व सौंदर्यशास्त्र क्षेत्रात स्प्रिंग क्लिनिक, चिपळूणने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त अत्याधुनिक पिको लेझर प्रणाली आणि डायोड लेझर प्रणाली चा शुभारंभ स्प्रिंग क्लिनिक येथे करण्यात आला आहे.
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेस, यू.एस.ए. या जागतिक मान्यताप्राप्त संस्थेद्वारे प्राधिकृत या पिको व डायोड वैद्यकीय लेसर प्रणालीमुळे आता कोकणातील त्वचारुग्णांना जागतिक दर्जाच्या लेसर उपचारांचा लाभ स्थानिक पातळीवर, स्थानिक शुल्कामध्ये उपलब्ध होणार आहे.
अत्याधुनिक डायोड लेझर प्रणालीद्वारे शरीरावरील तसेच चेहऱ्यावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी वेदनारहित पद्धतीने कमी होण्यास मदत होणार आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चेहरा किंवा शरीरावर अनावश्यक केस येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या तरुणींसाठी ही उपचारपद्धती विशेष लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड दूर होऊन आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीमत्वविकासाकरिता मदत होणार आहे.
*पिको लेझर प्रणालीद्वारे *जन्मखुणा, वांग, अपघातामुळे राहिलेले व्रण, नको असलेले गोंदण (टॅटू), त्वचेवरील रंगद्रव्याचे डाग(पिगमेंटेशन) तसेच विविध प्रकारच्या इतर त्वचा विकार व सौंदर्य समस्यावर आधुनिक, वेदना रहित आणि प्रभावी उपचार उपलब्ध होणार आहेत*.
कोकणातील रुग्णांना आता महागड्या उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या महानगरांत जाण्याची आवश्यकता राहणार नसून, या जागतिक दर्जाच्या सुविधा त्यांना आपल्या चिपळूणमध्येच उपलब्ध होणार आहेत .
ग्लोबल टेक्नॉलॉजी ऍट लोकल कॉस्ट‘ या संकल्पनेवर आधारित रुग्णहिताचा ध्यास घेत स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेझर क्लिनिकने पुन्हा कोकणात सर्वसामान्यांसाठी आधुनिक वैद्यकीय लेझर उपचारांची नवी दिशा दिली आहे अशा शब्दात मान्यवरांनी या सुविधाचे स्वागत केले आहे .
अधिक माहितीसाठी :
स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिक, स्वरविहार गृहसंकुल, जेड गार्डन, पिंपळ गणेश मंदिराजवळ, चिपळूण.
दूरध्वनी : (02355) 261234, 260677
मोबाईल : 9730906216 / 7998494949 / 9673956514 / 7588477690