RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

मौजे राजवाडी येथे गरम पाण्याचे कुंड सुशोभिकरणाचा प्रश्न मार्गी…

आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सुशोभिकरण कामाचे भुमिपुजन !

संगमेश्वर – मौजे राजवाडी येथील गरम पाण्याचे कुंड सुशोभिकरण कामाचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मान्यवर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

गावचा विकास व गरजा ओळखून नेहमीच त्या पुर्ण करण्यासाठी दाखवलेला तत्पर प्रतिसाद, हे आमदार निकमांचे एक वैशिष्ट्यचं. संगमेश्वर तालुक्यातील राजेवाडी येथील गरम पाण्याचे कुंड हे पर्यटकांना आकर्षित करणारे ग्रामीण भागातील एक महत्वाचे स्थळ आहे. या कुंडाचे सुशोभिकरण करून येथील पर्यटन वाढीस चालना मिळावी या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी शासनाच्या पर्यटन योजनेतून यास निधी उपलबद्ध करून दिला. राजेवाडी येथील या गरम पाण्याच्या कुंडाचे सुशोभिकरण होत असल्याने हे काम पुर्ण झाल्यावर येथे पर्यटकांचा ओघ वाढेल, त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्यामुळे ग्रामस्थांनी त्यादृष्टीने आपले कार्य चालू ठेवावे असे आमदार शेखर निकम यांनी आपले विचार व्यक्त करीत या कुंडाच्या सुशोभिकरणासाठी ज्यांनी आपली जमीन उपलबद्ध करून दिली त्या जमिनदारांचे आभार व्यक्त केले.

यावेळी राजेंद्र सुर्वे, संतोष थेराडे, ऋषिकेश नारकर-पर्यटन विभाग अभियंता, अमोल लोध, सतिश कामत, शेखर उकार्डे, अशोक सुर्वे, सरपंच सविता देवरुखकर, उपसरपंच अमित शिर्के, सहदेव सुवरे, दत्ता ओकटे, संतोष जाधव, संतोष भडवळकर, प्रकाश खांबे-गावकर, सिताराम बाईत, शंकर भडवळकर, विलास राऊत, तुकाराम गुरव, अरविंद जाधव, नवनाथ कदम व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.