/ Sep 25, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

चिपळूणमध्ये पत्रकार भवन उभारण्यासाठीजर्नालिस्ट असो.तर्फे नगराध्यक्षांना निवेदन

चिपळूण पालिकेत पत्रकार कक्ष उभारणार…..

चिपळूण : शहरात पत्रकार भवन उभारण्याकरिता पालकमंत्री श्री.उदय सामंत निधी देणार असून चिपळूण पालिकेतर्फे जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण या शासनमान्य नोंदणीकृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष श्री.उमेश सकपाळ यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, सचिव दीपक शिंदे, सहसचिव योगेश बांडागळे, सदस्य मकरंद भागवत, ललेश कदम उपस्थित होते.या भेटीत नगराध्यक्ष सकपाळ यांनी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच चिपळूण पालिकेत ताबडतोब पत्रकार कक्ष स्थापन केली जाईल अशी घोषणा केली. या घोषणेचे जर्नालिस्ट असोसिएशनने स्वागत केले.
जर्नालिस्ट असो.च्या पदाधिकाऱ्यांशी नगराध्यक्ष सकपाळ यांनी संवाद साधला. ते म्हणाले की,शहराच्या परिपूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शहर विकासासाठी ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना, शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण आदी महत्वपूर्ण कामांना चालना दिली जाईल. वर्षभरात ही कामे मार्गी लागतील. वर्षभरानंतर चिपळूणची स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिपळूणमधील विकास कामांसाठी जनता आणि जागा मालकांकडून सदैव सहकार्यच राहिले आहे. कोणतेही काम धाकधपटशाहीने करण्याऐवजी नागरिकांना विश्वासात घेऊन करण्यावर आपला भर आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही असा अनुभवही त्यांनी मांडला. शहरातील मुलांसाठी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेकरिता अभ्यासिका सुरु करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतरच वाहतुकीला शिस्त येईल असे मत त्यांनी नोंदवले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

marsbahis

marsbahis

marsbahis

marsbahis

marsbahis