/ Sep 05, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

पालकमंत्री उदय सामंत व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपालिकेला भरघोस निधी

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व समन्वयाने सुमारे २६ कोटीचा भरघोस निधी प्राप्त झालेला आहे, त्यामुळे विकास कामांना मोठी गती मिळणार आहे. युती शासनाने दिलेला या निधीतून काही महत्त्वाची कामे लवकरच मार्गी लागतील यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपच्या नगरसेविका वर्षा ढेकणे यांच्या प्रभागात नवीन शॉपिंग सेंटर मागण्या करता वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता तर वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी रत्नागिरी नगर परिषदेला सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून १४ कोटी ३० लाखाचा निधी मंजूर झाला आहे तसेच प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील नाला व रस्ता विकसित करण्यासाठी पाच कोटी सत्ता लागायचा निधी युती शासनाने मंजूर केला आहे त्यामुळे भाजप व शिवसेना स्थानिक समन्वयाने व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जवळपास २६ कोटीचा निधी रत्नागिरी नगर परिषदेला प्राप्त झाला आहे. या भरघोस निधीमुळे आता नगर परिषदेची काही प्रलंबित कामे त्वरित मार्गी लागणार आहेत व शहर विकासामध्ये अधिक भर पडणार आहे. या निधीमुळे स्थानिक भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तसेच नागरिकांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.