/ Sep 25, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

जिल्हा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण कार्यकारिणीची बैठक मोठ्या उत्साहात पार

रत्नागिरी – महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव प्रमुख उपस्थित होते. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि विविध मंडळांतील महिला प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, बूथ सक्षमीकरण, जनसंपर्क अभियान तसेच पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न, सूचना आणि संघटनात्मक बाबी मांडल्या. सर्वांचे म्हणणे सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले तसेच त्यावर योग्य मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.

प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी महिला मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्तीने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन केले.

बैठकीमुळे महिला मोर्चाच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात अधिक जोमाने संघटन वाढविण्याचा निर्धार उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तसेच या बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस नपुराताई मुळे श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष संगीता कवितके स्नेहा चव्हाण रूपाली कदम शितल रानडे मंडळ अध्यक्ष सुचिता नाचणकर शहराध्यक्ष भक्ती दळी सुयोग जठार ध्रुवी लाकडे सुप्रिया बेंद्रे वैदही बने आदिती गुडेकर रावी मोरे इत्यादी महिलांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारणीची बैठक पार पडली

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

marsbahis

marsbahis

marsbahis

marsbahis

marsbahis