/ Sep 05, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

रत्नागिरीत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे भाजप शहर मंडळाकडून उत्स्फूर्त स्वागत

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा. आशिषजी शेलार साहेब रत्नागिरी दौऱ्यावर आले असता भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन मा. आशिषजी शेलार यांचा सन्मान केला. कार्यक्रमास विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ज्येष्ठ पदाधिकारी बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर, सरचिटणीस ओंकार फडके, उपाध्यक्ष राजू भाटलेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मा. आशिषजी शेलार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन बळकटी, पक्षविस्तार आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन केले.

त्यांनी रत्नागिरीतील पक्ष संघटनेच्या कार्याचे कौतुक करत सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीमुळे रत्नागिरी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.